सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंद असलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande)आणि संतोष धुरी (Santosh Dhuri) यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. अटकपूर्व जामीनावर 17 मे च्या सुनावणीत न्यायालयानं निर्णय राखून ठेवला होता. आज जामीन मंजूर झाल्याने या दोघांना दिलासा मिळाला आहे.
संदीप देशपांडेच्या जामीन अर्जला राज्य सरकारकडून विरोध करण्यात आला होता. ज्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते दोघेही राजकीय नेते आहेत त्यामुळे जामीन दिल्यास पोलीस तपासावर परिणाम होऊ शकतो असा युक्तीवाद सरकारी पक्षाच्या वकिलांकडून करण्यात आला होता. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवाद केला होता. सुजाण नागरीक आणि कायद्याचं पालन करणारे असते तर त्यांनी पोलिसांना सहकार्य केलं असतं असं घरत म्हणाले.
प्रकरण नेमक काय?
भोंग्यांच्या विरोधात आंदोलनावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस गाडीत बसवण्यासाठी घेऊन जात होते. संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचं पोलिसांना सांगितले. काही अंतर पोलिसांसोबत चालत गेल्यानंतर अचानक हे दोघेही खासगी कारमध्ये बसले आणि कार भरधाव निघून गेली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही उपयोग झाला नाही. या सगळ्या गडबडीत एक महिला पोलीस जखमी झाली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








