ग्राम पंचायतीच्यावतीने ग्राम विकास मंत्र्यांना निवेदन
वार्ताहर /नंदगड
नंदगड गावच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी मंजूर करावा, या मागणीसाठी नंदगड ग्राम पंचायतीच्यावतीने ग्राम विकास मंत्री प्रियांक खर्गे यांना नुकताच निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना नंदगड ग्राम पंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते. नंदगड गाव बेळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख व ऐतिहासिक गाव आहे. क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णांची समाधी नंदगड येथे असल्याने विविध खात्याचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी वरचेवर गावाला भेट देत असतात. नंदगडच्या विकासासाठी अधिकाधिक अतिरिक्त निधी शासनाकडून मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.









