वृत्तसंस्था/ मार्सेली
चिलीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू सांचेझबरोबर इंटर मिलान फुटबॉल क्लबने पुन्हा नवा करार केला आहे. 2021-22 च्या फुटबॉल हंगामअखेर सांचेझने इंटर मिलान क्लबचा त्याग करून मार्सेली क्लबमध्ये दाखल झाला होता. पण आता पुन्हा इंटर मिलानने सांचेझबरोबर 2024 अखेरपर्यंत नवा करार केला आहे.
चिलीचा तो सर्वात अव्वल फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. 34 वर्षीय सांचेझने चिलीतर्फे सर्वाधिक गोल नोंदविले आहेत. यापूर्वी त्याने बार्सिलोना, अर्सेनेल, मँचेस्टर युनायटेड या क्लबचे प्रतिनिधीत्व केले आहे. गेल्या वर्षीच्या फुटबॉल हंगामात त्याने मार्सेली क्लबकडून खेळताना 44 सामन्यात 18 गोल नोंदविले आहेत. सिरी ए फुटबॉल स्पर्धेत इंटर मिलान संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले तर या संघाने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेची अंतिमफेरी गाठली होती. इंटर मिलान संघाने इटालियन चषक तसेच सुपर चषक फुटबॉल स्पर्धा जिंकल्या आहेत.









