वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकन क्रिकेट मंडळाने माजी धडाकेबाज फलंदाज सनथ जयसूर्याची एक वर्षाच्या कालावधीकरता पूर्ण वेळेसाठी क्रिकेट सल्लागारपदी नियुक्ती केली आहे.
बुधवारी राष्ट्रीय निवड समिती सदस्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर सनथ जयसूर्याची क्रिकेट सल्लागारपदी नियुक्ती करण्याचा निर्णय लंकन क्रिकेट मंडळाने घेतला आहे. सनथ जयसूर्या आपले हे नवे पद तातडीने स्वीकारणार आहेत. नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत लंकन संघाची कामगिरी अत्यंत निकृष्ट झाली होती. या स्पर्धेत त्यांना नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. लंकन संघाचा दर्जा सुधारण्यासाठी आता मंडळाने नवे धोरण अवलंबण्याचे ठरविले आहे.









