मुंबई
सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी एम 04 हा नवा मोबाइल फोन लाँच केला आहे. एम 04 स्मार्टफोन 6.5 इंचाच्या एचडी प्लस डिस्प्लेसह येणार आहे. 8 जीबी रॅमच्या फोनची किंमत 8499 रुपये इतकी असणार आहे.
16 डिसेंबरपासून फोन विक्रीकरिता उपलब्ध होणार आहे. 13 मेगा पिक्सल व 2 मेग पिक्सलचे दोन रियर कॅमेरे यात असतील. यात पाच मेगा पिक्सलचा प्रंट कॅमेरा आहे. मिंट ग्रीन, गोल्ड, पांढरा आणि निळा या रंगामध्ये हा फोन खरेदी करता येईल. 5 हजार एमएएच क्षमतेची बॅटरी यात असणार आहे. 128 जीबी इतक्या स्टोरेजची व्यवस्था यामध्ये असेल. सदरच्या फोनमध्ये 4जी, डय़ूअल बँड वायफाय, ब्लू टूथ, जीपीएस आणि यूएसबी टाईप सी पोर्टसारखी वैशिष्टय़े यांचा समावेश असणार आहे. सुरक्षिततेकरिता साइड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असणार आहे.









