एस24 आवृत्ती बाजारात दाखल होणार असल्याची शक्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दक्षिण कोरियातील टेक कंपनी सॅमसंग पुढली वर्षी जानेवारी 2024 मध्ये एस 24 ही आवृत्ती सादर करणार असल्याची माहिती आहे. सदरच्या होणाऱ्या कार्यक्रमात सॅमसंग गॅलेक्सी एस24, गॅलेक्सी एस24 प्लस आणि गॅलेक्सी 24 अल्ट्रा आदींचे सादरीकरण होणार आहे.
दरवर्षी कंपनी फेब्रुवारीमध्ये आपली सर्वात प्रीमियम एस आवृत्ती सादर करते. मात्र कंपनीने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. प्राप्त अहवालानुसार कंपनी आयफोन 15 प्रो प्रमाणे सॅमसंग गॅलेक्सी एस 24 अल्ट्रामध्ये टायटेनियम फ्रेम देण्याचे संकेत आहेत.
सॅमसंग गॅलेक्सी एस 24 संदर्भात :
डिस्प्ले : गॅलेक्सी एस 24 मध्ये 6.2 इंच अमोलेड डिस्प्ले, एस 24 प्लस मध्ये 6.7 इंच आणि एस 24 अल्ट्रा मध्ये 6.8 इंच डिस्प्ले देणार असल्याचेही संकेत व्यक्त केले जात आहेत.
कॅमेरा : फोटोग्राफी 200 एमपी प्राथमिक कॅमेरा व 12 एमपी अल्ट्रावाइड आणि 10 एमपी टेलिफोटो कॅमेरा मिळणार आहे.
प्रोसेसर : एक्सयोन्स 2400 प्रोसेसरसह एस 24 आणि इस 24 प्लस आणि कॅनडा अमेरिका सारख्या देशात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन प्रोसेसर राहणार आहे.









