नवी दिल्ली : सॅमसंग या कंपनीने आपला नवा स्मार्टफोन गॅलक्सी एस 23 एफई भारतात सादर केला आहे. यासोबत कंपनीने गॅलक्सी टॅब एस 9 एफई व बडस एफई ही उत्पादनेही लाँच केली आहेत. सॅमसंगच्या गॅलक्सी एस 23 ची किंमत ही 59 हजार 999 रुपये इतकी असणार असल्याचे समजते. सदरचा फोन खरेदीकरता सॅमसंगच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे या फोनच्या वितरणाला 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. नव्या गॅलक्सी टॅबची किमत कंपनीने 36 हजार 999 रुपये इतकी किमत ठेवली आहे. टॅब्लेटची खरेदी ग्राहकांना 7 ऑक्टोबरपासून करता येणार आहे. स्मार्टफोनवर मात्रा एचडीएफसी बँक कार्डधारकांना 6 हजार रुपयांची सवलत मिळणार आहे. टॅब्लेट खरेदीवर ग्राहकांना 5 हजाराची सवलत मिळणार आहे.
सॅमसंग गॅलक्सी एस 23 एफईची वैशिष्ट्यो
- 6.4 इंचाचा फुल्ल एचडी प्लस डायनॅमिक अमोलेड 2 एक्स डिस्प्ले
- 50 मेगापिक्सलचा कॅमेरा
- 8 जीबी रॅम व 128 जीबी व 256 जीबी स्टोरेज
- बॅटरी 4500 एमएएच
- 25 वॅटचा फास्ट चार्जर









