झेड फोल्ड6, फिल्प6 स्मार्टफोनचेही सादरीकरण
वृत्तसंस्था /पॅरिस
दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगने फ्रान्समध्ये सॅमसंगनेगॅलेक्सी स्मार्टरिंग सादर केली आहे. स्किन टेंपरेचर आणि हार्टरेट सेन्सरने सुसज्ज असणारी रिंग आयपी68 वॉटर रेझिस्टन्ससह येते. कंपनीने याची किंमत ही अंदाजे 33403 रुपये इतकी ठेवली आहे. कंपनीने बुधवारी पॅरिस, फ्रान्समध्ये आयोजित गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंट 2024 मध्ये सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड 6 आणि गॅलेक्सी झेड फ्लिप 6 स्मार्टफोन देखील सादर केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये नोट असिस्ट, चॅट असिस्ट, रिअल टाइम भाषांतर सर्कल टू सर्च यासारख्या अनेक प्रगत एआय सारखी फिचर्स देण्यात आली आहेत. याशिवाय गॅलेक्सी बड्स 3 आणि गॅलेक्सी अल्ट्रा वॉच सादर केले आहे. सर्व उपकरणांचे प्री बुकिंग सुरु झाले आहे.









