4जी स्मार्टफोनमध्ये 6,000 एमएएच क्षमतेची बॅटरी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
जगातील दिग्गज स्मार्टफोन निर्मिती कंपनी सॅमसंग यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये गॅलेक्सी एम 31 प्राईम आवृत्ती सादर केल्यानंतर सॅमसंग इंडियाने नुकतीच एम 32 प्राईम आवृत्ती भारतात सादर केली आहे. ऍमेझॉनच्या वेबसाईटवर विक्रीसाठी हे मॉडेल उपलब्ध होणार आहे.
यासोबतच कंपनी 6000 एमएएच क्षमतेची बॅटरीची सुविधाही या फोनमध्ये देणार असल्याची माहिती आहे. साधारणपणे या 4-जी मॉडेलच्या स्मार्टफोनची सुरुवातीची किमत 11,499 रुपये राहणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
2 स्टोरेजमध्ये उपलब्ध
एम32 प्राईम आवृत्ती 2 स्टोरेज मॉडेलमध्ये उपलब्ध होणार आहे. 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी स्टोरेज मॉडेलची किमत 11,499 रुपये आहे. यासोबतच 6जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किमत 13,499 रुपये आहे. मोबाईल प्राईम ब्ल्यू आणि ब्ल्यू कलर रंगाच्या पर्यायामध्ये उपलब्ध होणार आहे.
अन्य फिचर्स
- 130 तासांचा म्युझिक प्ले टाइम मिळणार
- 40 तास व्हॉईस कॉल मिळणार असल्याचा दावा
- रेडमी, ओप्पो, इन्फिनिक्स, टेक्नो व मोटोरोला यांना टक्कर देणार
- फुल्ल एचडीसह रिझोल्यूशनसोबत मोबाईल रिप्रेश रेट 90 एचझेड
- 64एमपीचा क्वाड कॅमेरा मिळणार









