6000 एमएएच क्षमतेची दमदार बॅटरीही मिळणार : किंमत 15 हजाराच्या घरात
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगने नुकताच भारतात सॅमसंग गॅलेक्सी एम 14 हा स्मार्टफोन 5-जी मध्ये भारतीय बाजारात सादर केला आहे. सदरचा स्मार्टफोन हा बजेट सेगमेंटमध्ये येणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. स्मार्टफोनमध्ये व्हॉईस फोकस फीचर आहे, जे आयफोनमध्ये आढळणाऱ्या व्हॉईस आयसोलेशनप्रमाणे काम करत असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सॅमसंगचा दावा आहे की या फीचरमुळे कॉलिंगचा अनुभव अत्युत्तम घेता येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. एम 14 या स्मार्टफोनची किमत ही मॉडेलनुसार निश्चित होणार आहे. हा स्मार्टफोन दोन प्रकारात लॉन्च केला आहे. 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत ही 13,490 रुपये आहे आणि 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ही 14,990 रुपये आहे. खरेदीदार 21 एप्रिलपासून दुपारी 12 वाजल्यापासून ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉन आणि सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवरून स्मार्टफोन खरेदी करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
अन्य फिचर्स :
कॅमेरा: फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा असणार आहे. यात 50एमपी प्राथमिक कॅमेरा, 2एमपीचा कॅमेरा व 2एमपी मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.
बॅटरी आणि चार्जिंग: पॉवर बॅकअपसाठी, फोनमध्ये मोठी 6000 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी 25 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. डिस्प्ले: 6.6-इंचाचा एचडी, आयपीसी, एलसीडी इन्फिनिटी डिस्प्ले आहे. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080 ते 2408 पिक्सेल आहे आणि ते 90 एचझेडच्या रिफ्रेश दराने कार्य करते.









