एफ04 स्मार्टफोन लाँचः किंमत 10 हजाराच्या घरात
नवी दिल्ली : दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग यांनी एफ04 हे मॉडेल भारतीय बाजारात सादर केले आहे. यामध्ये जवळपास 5000 एमएएच क्षमता असणाऱया बॅटरीची सुविधा असणार असल्याची माहिती आहे. यासोबतच स्मार्टफोनमध्ये 16.55 सेंटीमीटरचा एचडी डिस्प्लेही मिळणार आहे. यामध्ये पर्पल व ओपल ग्रीन या रंगात हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ04 4 जीबी रॅम व 64 जीबी स्टोरेजसह येणाऱया फोनची किमत 9,499 रुपये ठेवली आहे. सादरीकरणावेळी विशेष सवलत योजनाही लागू केली आहे.
अन्य फिचर्स…
- 13प्लस 2 मेगापिक्सलचा डबल कॅमेरा सोबत
- 6.5 इंचाच्या एचडी डिस्प्लेची सुविधा
- मीडियाटेक होलियो पी35 प्रोसेसरसह ओएस प्रणाली
- 4जी, 3जी, 2जी सपोर्ट डबल सिमसह अन्य सुविधा मिळणार









