वृत्तसंस्था /चेन्नई
2023 च्या आयपीएल क्रिकेट हंगामात बुधवारी येथे झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच कर्णधार तसेच यष्टीरक्षक व फलंदाज संजू सॅमसनने आपला विक्रम नोंदवला. आयपीएलच्या इतिहासामध्ये संजू सॅमसन हा सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात झालेल्या चेन्नईच्या रविंद्र जडेजाने संजू सॅमसनचा शून्यावर त्रिफ्ळा उडवला. सॅमसनच्या हा आठवा भोफळा आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा दिवंगत फिरकी गोलंदाज तसेच राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉर्न तसेच स्टुअर्ट बिन्नी यांच्या नावावर हा विक्रम होता. आता सॅमसनने शेन वॉर्न आणि बिन्नी यांना मागे टाकले आहे. वॉर्न आणि बिन्नि यांच्या नावावर सात भोपळे होते. त्याचप्रमाणे चेन्नईमधून खेळणारा अजिंक्य रहाणे याच्या नावावरही आतापर्यंत पाच भोफळे नोंदवले गेले आहे.









