कोल्हापूर :
पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशाने मटकाकिंग सम्राट कोराणेचा शुक्रवारी सकाळी कळंबा कारागृहातून ताब्यात घेवून त्याला बेड्या ठोकल्या. त्याला दुपारी जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने त्याला 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी कोराणेला वैद्यकिय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणले होते. त्यावेळी त्याच्या नातेवाईकासह समर्थकांनी सीपीआरच्या आवारात मोठी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांच्यात आणि कोराणे समर्थकाच्या शाब्दीक वादावादी झाल्याने, सीपीआरच्या आवारात काही काळ तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये दाखल केलेल्या (मोका) गुह्यात सुमारे सहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा मटकाकिंग सम्राट सुभाष उर्फ बबनराव कोराणे (रा. वेताळमाळ तालीमशेजारी, शिवाजी पेठ, कोल्हापूर) बुधवारी जिल्हा आणि सत्र न्यायालयात स्वत:हून शरण आल्याने, त्याला न्यायालयाच्या आदेशाने पोलिसांनी तत्काळ अटक कऊन, न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्याची रवानगी कळंबा कारागृहात करण्यात आली. त्यानंतर या गुह्याचा तपासी पोलीस अधिकारी पोलीस उपाअधीक्षक अजित टिके यांनी त्याचा तपासासाठी ताबा मिळावा. यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात गुऊवारी सकाळी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होवून न्यायालयाने पोलिसांचा ताबा अर्ज मंजुर केला.
त्यानुसार शहर पोलीस उपाअधीक्षक अजित टिके यांच्या पोलीस पथक मटाकाकिंग कोराणेचा शुक्रवारी सकाळी कळंबा कारागृहातून ताबा घेवून अटक केली. त्याला वैद्यकिय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणले. पोलिसांनी कोराणेला सीपीआरमध्ये आणल्याची माहिती समजताच त्याच्या नातेवाईकासह समर्थकांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. त्यामुळे सीपीआरच्या अपघात विभागासमोर मोठी गर्दी झाल्याने, कोणतेही अनुचित घटना घडू नये. याकरीता पोलिसांच्याकडून गर्दी पांगविण्याचा प्रयत्न सुऊ झाला. याचवेळी पोलीस आणि कोराणे समर्थकांच्यामध्ये शाब्दीक वाद झाला. या वादाने सीपीआरच्या आवारात काही काळ तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. पोलिसांच्याकडून त्याच्या अटकेची सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण कऊन, त्याच्या हाताला बेड्या ठोकून दुपारी जिल्हा व सत्र न्यायालयात मोठ्या पोलीस बंदोबस्तात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्याला 18 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
- आश्रय दिलेल्यांची चौकशी सुरु
मोका कायद्यान्वये गुन्हा दाखल झालेल्या दिवसापासून मटकाकिंग सम्राट कोराणेने पोलीस अटक करतील. याच्या धास्तीने त्याने शहरातील राहत्या बंगल्यातून धुम ठोकली. अटकपूर्व जामिन अर्ज मिळविण्यासाठी मोका विशेष न्यायालयापासून मुंबई उच्च न्यायालय, दिल्ली सर्वोच्च्य न्यायालयापर्यंत धाव घेतली. या प्रत्येक ठिकाणी न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामिनअर्ज फेटाळून लावून, त्याला फरारी घोषीत केले. सुमारे सहा वर्षे तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. या सहा वर्षाच्या काळात त्याला कोणी कोणी आश्रय दिला. याची पोलिसांनी कसून चौकशी सुऊ केली आहे. त्यामुळे आश्रयदात्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
- आश्रयदाते होणार सहआरोपी
मोक्यासारख्या गंभीर गुह्यात फरारी मटका सम्राट कोराणेने कोठे–कोठे आश्रय घेतला. त्या आश्रय घेतलेल्या ठिकाणाची माहितीसह त्याचे कोण आश्रयदाते होते. याची संपूर्ण कुंडली पोलिसांनी त्याच्याकडून घेवून, गंभीर गुह्यात कोराणे फरारी आहे. हे माहित असूनही त्याला जाणून बुजून आश्रय देणाऱ्या आश्रयदातेना या गुह्यात सहआरोपी करण्यासाठी पोलिसांनी हालचाली गतीमान केल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.








