वृत्तसंस्था / ब्रिजटाऊन
विंडीजचा माजी कर्णधार डरेन सॅमीची विंडीज संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विंडीज क्रिकेट मंडळाने सदर घोषणा येथे मंगळवारी केली.
डरेन सॅमी आता विंडीजच्या वनडे, कसोटी आणि टी-20 संघालाही प्रमुख प्रशिक्षक म्हणून लाभणार आहे. 2023 पासून विंडीज संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची सुत्रे सॅमीकडे होती. 2023 पासून क्रिकेट विंडीजने सॅमीवर विंडीजच्या विविध संघांच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबादारी सोपविण्यात आली होती.









