तिसवाडी : कुंभारजुवे मतदारसंघातील समाजकार्यकर्ते तथा तृणमूल काँग्रेस पक्षाचे गोवा समन्वयक आणि सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा चळवळीचे खंदे समर्थक समील वळवईकर यांनी म्हादई लढ्याच्या समर्थनार्थ आणि लोकजागृतीसाठी जुने गोवे येथील फेरीबोट धक्क्याजवळ लावलेले बॅनर्स समाजकंटकांनी फाडून टाकले आहेत. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे या बॅनर्सच्या बाजूलाच असलेला आमदार राजेश फळदेसाई यांच्या बॅनरला समाजकंटकांनी हात लावलेला नाही. म्हादई ही गोव्याची जीवनदायीनी असल्याने आणि ती संपूर्ण गोव्यासाठी किती महत्वाची आहे, याची पूर्ण जाणीव असल्याने समिल वळवईकर सुरुवातीपासून म्हादई बचाव चळवळीत क्रियाशील आहेत. म्हादईच्या लढ्यात ते सक्रीय आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी कुंभारजुवे मतदारसंघात म्हादई बचावचे बॅनर लावले आहेत. जुने गोवे – दिवाडी फेरीबोटीच्या जुने गोवे धक्याजवळ लावलेले म्हादईचे त्यांचे बॅनर फाडण्याची ही दुसरी वेळ आहे. समिल वळवईकर यांच्याबाबत कुणी वैयक्तिक किंवा राजकीय नाराजी असू शकते, मात्र म्हादईसारख्या विषयाबाबतही त्यांना आक्षेप का असावा, असा प्रश्न मतदारसंघात चर्चिला जात आहे.
Previous Articleसमाजकार्यकर्ती रेवती यांचा असोळणे येथे सत्कार
Next Article आगीमुळे वन्यप्राण्यांच्या हिरवळ खद्यावर परिणाम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









