समीरा रेड्डी 2012 मध्ये ‘तेज’ या चित्रपटात यापूर्वी दिसून आली होती. समीराने कारकीर्द यशाच्या शिखरावर असताना 2014 साली उद्योजक अक्षय वर्देसोबत विवाह केला होता. त्यानंतर ती परिवाराच्या देखभालीत गुंतून राहिली आणि कारकीर्दीकडे तिने दुर्लक्ष केले, अभिनेत्री सध्या एक मुलगी आणि एक मुलाची आईची आहे. आता 13 वर्षांनी समीरा पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार आहे. ‘चिमनी’ या चित्रपटाद्वारे ती पुनरागमन करणार आहे. एक वर्षापूर्वी माझ्या मुलाने माझा ‘रेस’ हा चित्रपट पाहिला होता. त्याने आई तुम्हा आता पूर्वीसारखी दिसत नसल्याचे म्हणत अभिनय का करत नसल्याचे विचारले होते. तेव्हा मी तुम्हा मुलांची देखभाल करण्यात व्यग्र असते असे उत्तर दिले होते, या घटनेने मला बॉलिवूडपासून दूर राहण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास भाग पाडल्याचे समीरा सांगते. दीर्घकाळानंतर सेटवर परतले असता काहीवेळ अस्वस्थ होते, परंतु काही वेळातच अभिनयाची लय सापडली असे समीराने म्हटले आहे. 46 वर्षीय समीरा ही सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते.









