Sameer Wankhede : एनसीबी मुंबईचे (NCB Mumbai) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना सोशल मीडियावरून धमक्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली आहे. यासंदर्भात समीर वानखेडे यांनी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात (Mumbai Goregaon Police) तक्रार दाखल केली आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल केल्यापासून धमक्या येत असल्याचे समीर वानखेडे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
वानखडे यांना आरोपीने टॅग करून हा मेसेज केला होता. यावर वानखडे यांनी त्याला उत्तर देखील दिले आहे. त्यानंतर काही तासात आरोपीने ते ट्वीट डिलिट केले. तपासात हे अकाऊंट त्याच दिवशी सुरू करण्यात आले होते, अशी माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Previous Articleआधी मंडप उभारणी; नंतर परवानगी
Next Article वनखात्याची छावणी तरीही हुलकावणी








