सावंतवाडी । प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे धडाडीचे नेतृत्व व वैश्य समाजाचे युवा संघटक समीर वंजारी हे आत्ताच झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सह . पतसंस्था मर्यादित फोंडाघाटचे संचालक म्हणून माणगाव खोरे, सावंतवाडी तालुका व दोडामार्ग तालुका यातून निवडून आले आहेत. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.ह्या क्षेत्रामध्ये ते आपला खास ठसा उमटवतील यामध्ये कोणतीही शंका नाही, असे त्यांच्या न्याती बांधवातून बोलले जात आहे.









