भिलवडी / घनःशाम मोरे :
दोन दिवसापूर्वी भिलवडी शिक्षण संस्थेच्या खाजगी मराठी शाळेतील राज वैभव पवार (वय ६) इ १ ली या विद्यार्थ्याला डंपरने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. ही घटना ताजी असताना आज सकाळी ९ वा. भिलवडी एसटी स्टँड समोर शाळकरी मुलगा विराज दिपक माने (वय १०) ५ वी याला माल वाहतूक टेम्पोने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला.
तर खंडोबाची वाडी येथील पद्मभूषण वसंतदादा महाविद्यालयासमोर एका शाळकरी मुलाचा अपघात झाला. यामध्ये तोही गंभीर जखमी झाला. या ठिकाणी होणाऱ्या वारंवार अपघातामुळे पालक वर्ग चिंताग्रस्त बनला आहे. औदुंबर फाटा ते माळवाडी दरम्यान सतत अपघाताचे सत्र सुरूच आहे.
आजअखेर पंधराहून अधिक ग्रामस्थांचा या राज्यमार्गवर अपघात होऊन प्राण गेला आहे. तरीही बांधकाम विभाग व संबंधीत प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने भिलवडीतील अपघात घडलेल्या ठिकाणी ग्रामस्थांनी रास्तारोको करीत इशारा दिला. या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी भेट देऊन रास्तारोकोपेक्षा संबंधीत बांधकाम विभागाशी संपर्क साथत उपाय योजना करूया असे ग्रामस्थांना सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभाग (इस्लामपूर) कनिष्ठ अभियंता अस्मिता बर्गे यांना माहिती दिली.
यानंतर आक्रमक झालेले दिपक पाटील ‘माजी उपसरपंच मोहन तावदर ‘सचिन पाटील’ सनी यादव यांच्या समवेत भिलवडी पोलीसात बैठक झाली यात कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील या बाबत चर्चा झाली. त्यानंतर अपघात घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन अंकलखोप पेट्रोल पंप ते खंडोबाची वाडी या ठिकाणापर्यंत कोणकोणती उपाययोजना कराव्या लागतील याची पहाणी केली. यामध्ये भगतसिंग हायस्कूलच्या पुढचा टर्न ब्लिंकर बसवणे ‘रेडियम बोर्ड लावणे सर्वच ठिकाणच्या शेतालगतचे गवत काढणे ‘भगतसिंग हायस्कूल सहा इंचाचा रबरी गतिरोधक बसवणे, झाडांची छाटणी करणे, पुढे शाळा आहे हा बोर्ड बसवणे, औदुंबर फाटा येथे सहा इंचाचा गतिरोधक बसवणे, भिलवडी पूल ब्लिंकर बसवणे ‘सर्व होल ब्लॉक झाले ते क्लिअर करणे जय भवानी मैदान गतिरोधक बसवणे ‘भिलवडी गावातील प्रत्येक गल्लीच्या एन्ट्रीला गतिरोधक तयार करणे, दिशादर्शक सर्व बोर्डावर झाडांची पाने आले आहेत ती छाटणी करून घेणे.
मुख्य रस्त्यावर पट्टा मारणे, रिक्षा स्टॅन्डजवळ बोर्ड लावणे, लिकेज काढून घेणे ‘सरळी पूल (भिलवडी कडून) एकेरी मार्गाचा बोर्ड लावणे ‘डेलीनेटर लावणे, ‘सरळी पुल (माळवाडी कडून) अपघातक्षेत्रचा बोर्ड लावणे, गतिरोधक करणे, ब्लिंकर आणि दिशादर्शक बोर्ड काढून पुढच्या बाजूला लावणे ‘स्पीड कमी करण्याबाबतचा बोर्ड लावणे, सेकंडरी स्कूल भिलवडी शाळेजवळ रबरी गतिरोधक बसवणे, पुढे शाळा आहे, मोठ्या टर्नबाबत बोर्ड लावणे, माळवाडी चौक, गतिरोधक तयार करणे खंडोबाची वाडी जिप शाळा व भारती विद्यापीठाजवळ गतिरोधक करणे, शाळेबाबत बोर्ड लावणे, या उपाय योजना करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आस्मिता बर्गे यांना ग्रामस्थांनी माहिती दिली. या उपाययोजना तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
- विषय मार्गी लावण्यास मदत..
रबरी गतिरोधक बसवणे, पुढे शाळा आहे, मोठ्या टर्नबाबत बोर्ड लावणे, माळवाडी चौक, गतिरोधक तयार करणे खंडोबाची वाडी जिप शाळा व भारती विद्यापीठाजवळ गतिरोधक करणे, शाळेबाबत बोर्ड लावणे, या उपाय योजना करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आस्मिता बर्गे यांना ग्रामस्थांनी माहिती दिली. या उपाययोजना तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. भिलवडीचे व इस्लामपूर येथील सहय्यक अभियंता संकेत पाटील यांनी व माजी उपसरपंच मोहन तावदर ‘दिपक पाटील’ सनी यादव’ सपोनि भगवान पालवे यांनी रास्ता रोको व आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांची समजूत काढत आंदोलन थांबवले व बांधकाम विभागाशी संपर्क साधून अधिकारी वर्गास बोलावून उपाययोजना करण्यासाठी रस्त्याची पाहणी करून विषय मार्गी लावण्यास मोठी मदत केली.








