काँग्रेस सरकारच्या गॅरंटी योजनेतील गृहलक्ष्मी योजनेचा लाभ अधिकाधिक जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी काही बदल केले जात असून यामुळेच अर्ज स्वीकारण्यात प्रलंब होत असल्याचे महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.
चिक्कमंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, गृहलक्ष्मी योजनेचा लाभ सहजपणे मिळण्याकरिता त्यात काही बदल केले जात आहेत. यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विलंब होतं आहे.
गृहलक्ष्मी योजनेसाठी विविध अँप तयार केले जात असून या माध्यमातून अर्ज दाखल करून घेण्याचा वेग वाढणार आहे. याआधी कर्नाटक वन, ग्राम वनमध्ये अर्ज दाखल करण्यासाठी परवानगी दिली होती आता ग्रामीण स्तरातील बापूजी केंद्रांमध्ये देखील अर्ज सादर करता येईल. ऑगस्ट १७ अथवा १८ रोजी लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









