वार्ताहर/सांबरा
सन 2016 मध्ये बेळगाव बागलकोट मार्गावरील सांबरा येथे रस्त्याच्या मागणीसाठी रास्तारोको आंदोलन छेडलेल्या माजी जि. पं. सदस्य नागेश देसाई यांच्यासह नऊ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. 2016 मध्ये सांबरा विमानतळापलीकडील शेताला जाणारा रस्ता वाहून गेला होता. सदर रस्ता त्वरित करून द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन छेडत बेळगाव बागलकोट मार्गावर रास्तारोको केला होता. रास्तारोको केल्याचा ठपका ठेवत मारिहाळ पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा नोंदविला होता. सदर खटला तृतीय सत्र न्यायालयात सुरू होता. या खटल्यातून नागेश देसाई, लक्ष्मण कोळ्यापगोळ, गजानन पाटील, यल्लाप्पा सुळेभावी, मदन आप्पयाचे, लक्ष्मण तिप्पाणाचे, महेश जत्राटी, भावकाण्णा बसरीकट्टी व उमेश धर्मोजी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादींच्या बाजूने अॅड. सुधीर कडोलकर यांनी काम पाहिले.









