सांगली :
- सांभारे घराण्याची ओळख
सांभारे (राजहंस) घराणे मूळचे तासगाव (तासम्-गाव चिंचणी) येथील आहेत. पारंपरिकरित्या घराण्यात पौरोहित्य आणि वैद्यकी या व्यवसायाचा वारसा आहे. चिंतामणराव पटवर्धन (दुसरे) सांगलीत राजवैद्य म्हणून आले. त्यांनी राजमाता आबासाहेब राजहंस यांचे औषधोपचार करून त्यांना बरे केले आणि राजवैद्य पद-वी दिली. पंचायतन देवळातील सांबाच्या देवळाची पूजा कायमस्वरूपी देण्याचे वचन दिले, त्यामुळे ‘सांभारे’ हे आडनाव आले.
- गणेशोत्सवाची सुरुवात
सांगली संस्थानमध्ये गणेशोत्सव १८९५ साली सुरू झाला. मित्रमंडळींनी सुचवले की, ‘आपणही गणेशोत्सव साजरा करावा.’ १८९६ साली आठ फूट उंच शाडू मूर्ती वासुनाना घाडगे यांनी तयार केली. मिरवणुकीसाठी मूर्ती मारुती चौकापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, पण वजनामुळे गाड्याचे चाक तुटले आणि मूर्तीला इजा झाली. लगेचच तट्ट्या व बांबू वापरून मूर्ती सुरक्षित केली गेली. यानंतर दुसरी गणेशमूर्ती तयार करण्यास सुरुवात झाली. पण दहा फूट गणेशमूर्ती तयार करण्यास τ 2 दशमीची तिथी उगवली, त्यामुळे दशमीला प्रतिष्ठापना आणि अनंतचतुर्दशीला विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली.
- मूर्ती आणि मिरवणूक
सन १८९९ मध्ये बसवलेली मूर्ती आजही मारुती चौकाजवळील सांभारे वाड्यात पाहायला मिळते. लोकमान्य टिळक सांगलीत आले तेव्हा त्यांनी ही मूर्ती पुण्याला नेण्याचा विचार केला, पण कात्रज घाटातून नेताना अडचणी येऊ शकतात म्हणून तो विचार मागे घेतला.
- लाकडी मूर्तीची निर्मिती
१८८८ साली कायमस्वरूपी लाकडी मूर्ती तयार करण्याचा विचार सुरू झाला. पुण्याचे गोविंद सुतार आबासाहेबांकडे आले आणि त्यांनी मूर्तीचे स्ट्रक्चर तयार केले. वासुनाना घाडगे यांनी कागदाचा लग्-ादा वापरून मूर्तीला आकार दिला. चौदा फूट उंच, नऊ फूट रुंदी, दीड टन वजन असलेली मूर्ती तयार करण्यासाठी सहा महिने लागले. १८९९ साली तिसरी मूर्ती प्रतिष्ठापित झाली. ही मूर्ती पांगिरा लाकडापासून बनविण्यात आली आहे.
- मिरवणूक आणि संगीत सभा
१९२८ साली ट्रकवरून मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू झाली. मूर्तीची मिरवणूक सकाळी नऊ वाजता सुरू होऊन दुपारी वाड्यात परत येत असे. त्यानंतर यठिकाणी संगीत सभा सुरू व्हायची. याप्रसंगी त्या काळात दिग्गज कलाकार येत असत आणि गणेशोत्सवदरम्यान अ-खंड गायन, वादन आणि नृत्य करण्यात येत असे. उत्सव दुपारी व संध्याकाळी संगीत सभा आणि अनंत चतुर्दशीपर्यंत पाच दिवस अखंड चालत असे.
- २ ऑगस्टपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
मंगळवार २ रोजी प्रतिष्ठापनेनंतर सकाळी विकास जोशी, श्रीकृष्ण गोडबोले, सोमशेखर ओतारी आदींचे भजन-गायन होणार आहे. बालकीर्तनकार श्रेया दिक्षित व ओम जमदनी यांचे संध्याकाळी कीर्तन आहे. रात्री मधुरा व भैरवी किरपेकर यांची मैफिल रसिकांना मंत्रमुग्ध करेल. बुधवारी दिलीप गाडगीळ व ब्रह्मवृंदाची महामंत्र पुष्पांजली आहे. शुभदा पाटणकर व सहकाऱ्यांचे शिवतांडव रामतांडव स्तोत्र सादर होईल. श्रद्धा दांडेकर, श्रुती बोकील व अभिषेक काळे यांचेही गायन होईल. गुरुवारी सत्यनारायण पूजा, महाप्रसाद तसेच सारंग सांभारे यांचा हार्मोनियम सोलो आणि रात्री पं. हृषीकेश बोडस यांची मैफल होणार आहे. शुक्रवारी सुगम संगीत, तर शनिवारी भक्तिगीते, हास्याविष्कार आणि विसर्जन मिरवणूक होऊन उत्सवाची सांगता होईल. सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केदार व अमोल सांभारे यांनी केले आहे.








