कोल्हापूर- गेल्या काही दिवसांपासून राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राज्यातील राजकारण तापले आहे. शिवबंधन बांधल्याशिवाय उमेदवारी नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतल्यानंतर संभाजीराजे समर्थक आक्रमक झालेत. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा केल्याशिवाय व्यक्त होणार नाही. अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून संयमाची भूमिका घेतलेल्या संभाजीराजे छत्रपती सोशल मीडियावर व्यक्त होत राज्यकर्त्यांना सूचक इशारा दिला आहे. आज सकाळी त्यांनी ट्विटरवरून पोस्ट करत एकप्रकारे पुढील राजकारणाची दिशा असणारी भूमिका व्यक्त केली जात असल्याची चर्चा आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी ” महाराज… तुमच्या नजरेतलं #स्वराज्य मला घडवायचंय… मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी… मी बांधील असेन तो फक्त जनतेशी…’ असे ट्विट करून राजकीय ट्विस्ट वाढवली आहे.
Previous Articleपंचायतींवर 20 जूनपासून प्रशासक
Next Article लक्ष क्रिकेट अकादमी, झेन स्पोर्ट्स संघ विजयी








