Kolhapur Sambhaji Raje News : सामान्यांच्या कल्याणासाठी दसऱ्यानंतर स्वराज्य संघटनेचा राज्यभर दौरा करणार असल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिली. संभाजीराजे आणि संयोगिता राजे छत्रपती यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, सामान्यांच्या कल्याणासाठी दौरा करणार असून याची सुरुवात जालन्यातून होणार आहे. पण हा दौरा कोल्हापुरात होणार नाही. महाराष्ट्र आणि कोल्हापुर हे वेगळं नसल्याने कोल्हापुरात दौरा होणार नाही असेही ते म्हणाले. या दौऱ्यानंतर संभाजीराजे काय भूमिका असणार आहे ? हे काळ ठरवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली आहे यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात जे सुरु आहे ते अशोभानीय आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही. मुख्यमंत्री हे सन्मानाचे पद, मुख्यमंत्री कोणीही असो धमकी देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Previous Articleजीवन संपते, डेथनोटही मिळते, पण पुढे काय?
Next Article अनैतिक संबंधातून कसबा बावडा येथे महिलेचा खून









