ऑनलाईन टीम / तरुण भारत :
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshayri) यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात स्वराज्य संघटनेने काळे झेंडे दाखवून कोश्यारींचा निषेध केला. याप्रकरणी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी पोलिसांच्या या कारवाईवर संताप व्यक्त केला आहे.
संभाजीराजेंनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी पुण्यातील घटनेचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, “राज्यपालांना काळे झेंडे दाखवले म्हणून अटक! आणि देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या कोश्यारींना सुरक्षा! हा कोणता न्याय?
स्वराज्य संघटचे प्रवक्ते धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे भगतसिंग कोश्यारीला काळे झेंडे दाखवले. त्यामुळे स्वराज्यच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करून ते उघड माथ्याने कसे फिरत आहेत? त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. उलट त्यांच्या वक्तव्याचा संविधानिक मार्गाने निषेध केला तरी पोलीस कारवाई करतात, हा कुठला न्याय आहे ?”
अधिक वाचा : संभाजीराजेंची संघटना आक्रमक; पुण्यात कोश्यारींना दाखवले काळे झेंडे