कोल्हापूर प्रतिनिधी
स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती रविवारी (दि. 4) दुपारी वाजता विशाळगडाला भेट देवून पाहणी करणार आहेत. सद्यःस्थितीत विशाळगडवरील अतिक्रमणाचा विषय चर्चेत आहे. हिंदूत्ववादी संघटनांनी या गडावर असणारी अतिक्रमणे, बेकायदेशीर बांधकामे निष्कासित करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणेलाही निवेदने दिली जात आहे. प्रतापगडावरील अफजलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमणे गेल्या महिन्यात पाडण्यात आली होती. त्यानंतर आता विशाळगडावरील अतिक्रमणे काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांची ही पाहणी, भेट चर्चेचा विषय ठरली आहे.