राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार याच्या संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानवरून राजकारण तापत असल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांच्याविरोधात विविध संघटनांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात य़ेत आहे. स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी सुध्दा अजित पवार य़ांचे विधान खोडून काढून पवारांनी हे विधान कोणत्या संदर्भावरून केले आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
महाराष्ट्र विधानसभेत बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे विधान केले. यामुळे अधिवेशन काळात बराच गदारोळ झाला. विविध संघटनांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे क्षत्रपती यांनी यांनीही अजित पवार यांच्या विधानाचा निषेध केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “”मी संभाजी महाराज यांना स्वराज्यवीर, धर्मवीर असं नेहमीच म्हटलंय. अजित पवारांनी कोणता संदर्भ देऊन विधान केलं आहे ते स्पष्ट कराव. ऐतिहासिक संदर्भ, घटना सांगायची असेल तर अभ्यास न करता प्रतिक्रिया देऊ नये. अजित पवार अर्धसत्य बोलले..त्यांचं विधान चुकीचं आहे….स्वराज्यरक्षक बोलले तर बरोबर आहे. पण धर्मवीर नव्हते असं बोलणं चुकीचं आहे.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









