आज भव्य मिरवणूक : संभाजीराव भिडे गुऊजींच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना : शनिवारी लोकार्पण
वार्ताहर/सांबरा
बाळेकुंद्री खुर्द येथे बुधवार दि. 19 रोजी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व लोकार्पण सोहळ्याला उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी माऊती गल्ली अनगोळ येथे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी मूर्तीचे पूजन केले. त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. अनगोळ, येळ्ळूर रोड, नाथ पै सर्कल, कपिलेश्वर रोड, पाटील गल्ली, सीबीटी, गांधीनगर, सांबरा रोड मार्गे मिरवणूक सायंकाळी गावामध्ये पोहोचली. यावेळी मूर्तीचे ठिकठिकाणी आरती ओवाळून स्वागत केले
गावामध्ये आज भव्य मिरवणूक
गुऊवार दि. 20 रोजी मूर्तीची गावामध्ये भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मेन रोड येथून दुपारी तीन वाजता मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर मिरवणूक पेठ गल्ली, लक्ष्मी गल्ली, पाटील गल्ली, शिवाजी गल्ली येथून कलमेश्वर मंदिर समोर येणार आहे. या सोहळ्dयानिमित्त गावांमध्ये भव्य स्वागत कमानी उभारल्या असून, वीर पुऊषांचे कटआऊट्स लावले आहेत. गावामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून, सर्वत्र भगवे फेटे व ध्वज लावण्यात आले आहेत. त्यामुळे गावामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उद्या मूर्ती प्रतिष्ठापना
शुक्रवार दि. 21 रोजी सकाळी दहा वाजता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुऊजी यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांच्याहस्ते ध्वजारोहण होईल. शनिवार दि. 22 रोजी सायंकाळी सहा वाजता महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे. परिसरातील शंभू भक्तांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे शंभू स्मारक सेवा समितीने आवाहन केले आहे.









