मुंबई/प्रतिनिधी
भीमा कोरेगाव प्रकरणी (bhima koregaon violence) संभाजी भीडे (sambhaji bhide) यांना क्लीनचिट मिळाली आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर ही घटना गंभीर असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील (jayant patil) यांच्यामुळे संभाजी भीडेंना क्लीनचिट मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सहभाग नसल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे. यासंदर्भात यापूर्वीच भिडेंना क्लीनचीट मिळाली होती. आता दोषारोपपत्रातूनही त्यांच नाव वगळण्यात आलं आहे. याबाबतचं पत्रही पुणे पोलिसांनी मानवी हक्क आयोगाला दिल्याची माहिती भिडेंचे वकील ॲड. पुष्कर दुर्गे यांनी दिली.
संभाजी भिडे यांना क्लीन चिट यावर एका वृत्तवाहिनीशी बोलतांना आंबेकर म्हणाले, भीमा कोरेगाव प्रकरणी ज्या तपास अधिकाऱ्यानं हे क्लीनचिट दिले आहे त्याने सर्वाेच्च न्यायालयाला दिलेले अॅफिडेव्हिट नीट वाचलेले दिसत नाही. सर्वाेच्च न्यायालयाला असे सांगण्यात आले आहे की संभाजी भिडे आणि एकबोटे या प्रकरणी दोषी आहेत. त्यामुळे तपास अधिकाऱ्याने कुणाच्या तरी सांगण्यावरुन भीडे यांना क्लीनचिट दिली. तपास अधिकाऱ्याने सर्वोच्च न्यायालयात जे अॅफिडेव्हीट दिले त्यात भिडे हे दोषी आहे. त्यामुळे तपास अधिकाऱ्यानेच त्यांना क्लिनचीट दिल्याने तो अधिकारीच संशयाच्या भोवऱ्यात आला आहे.
पुढे आंबेडकर म्हणाले, भिडे हे या प्रकरणी निर्दाेष आहेत यावर तपास अधिकारी कसे आहे, हे पाहणे गरजेचे आहे. न्यायालयाची या प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया ही पूर्ण झाली नाही. ज्यांनी त्यांना निर्दाेष ठरवले आहे, त्या प्रक्रियेवरही पुन्हा आषेप नोंदवला जाणार आहे. पुन्हा तपासा संदर्भातील कागदपत्रे मागवली जातील. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते असलेले जयंत पाटीलच जर भींडेच्या पाया पडत असतील तर नेमके या प्रकरणात कुणाचा हात आहे हे स्पष्ट होते. कोरेगाव भीमा हे एक षडयंत्र आहे असे म्हणत माझ्याकडे सर्व पूरावे आहेत असे शरद पवार म्हणाले होते. पण त्यांच्याच पक्षातील नेते भिडे सारख्या व्यक्तींच्या पाया पडत असतील तर यावरुन सर्व काही स्पष्ट होते.









