आरोपी गदग, बेंगळूरचे
चंदगड प्रतिनिधी
तुडये-कोलिक मार्गावर सांबर सदृष्य प्राण्याची शिकार करून मांस गाडीतून नेत असता शुक्रवारी पहाटे चंदगड पोलीसांनी सैफुद्दीन शमशुद्दीन शहा रा. बेंगलोर आणि चेतनकुमार सुभाषचंद्र अभिगिरी रा. गदग यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास तुडये कोलिक रोडवर पोलीस निरीक्षक संतोष घोळवे हे रात्रगस्त करत असताना एका पोल्ट्री जवळ 10-12 व्यक्ती चार वाहनासोबत संशयितरित्या दिसून आल्याने त्यांना हटकले असता, त्यातील सर्व इसम पळून जाऊ लागल्यामुळे त्यातील दोन इसमांना ताब्यात घेतले असता एका इसमाचे ताब्यात स्नॅपर रायफल व एका वाहनांमध्ये वन्य प्राण्याचे मास सापडले. वनविभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांना माहिती देऊन घटनास्थळी बोलावून वाहनाची तपासणी केली असता सांबर सदृश्य प्राण्याचे मांस मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. यातील आरोपी यांची आंतरराज्य टोळी असण्याची शक्मयता असून त्याबाबत तपास चालू आहे. ही कारवाई पोलीस व वन विभागामार्फत संयुक्तरीत्या करण्यात आली असून पोलीस दलातील संदीप कांबळे, पोलीस नाईक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी हत्त्यार बंद आरोपींना सिताफिने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस विभागाकडून पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस शिपाई संदीप कांबळे, पोलीस नाईक डोंगरे, पोलीस शिपाई युवराज पाटील, पोलीस नाईक भदरगे यांनी सहभाग घेतला तर वन विभागाकडून वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे, वनपाल एन. एन. धामणकर, वनपाल बी. आर. भांडकोळी, वनरक्षक तांबेकर, एम. आय. सनदी, विश्वनाथ नार्वेकर यांनी केली आहे. पुढील कारवाई एसीएफ एन. एस. कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत आवळे करीत आहेत.