सातारा प्रचार दौयात विशेष सेवा देणाया कार्यकर्त्यांचा सत्कार संपन्न
प्रतिनिधी/ सातारा
श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामींच्या चरणपादुकांचा यावर्षी चा प्रचार व प्रसार दौरा सुरू झाला आहे . या आठवडय़ात दिनांक 13 नोव्हेंबर पासून 20 नोव्हेंबर पर्यंत सकाळी या चरणपादुका राजवाडा परिसरातील समर्थ सेवा मंडळाच्या श्री समर्थ सदन संस्कृतीक केंद्रात मुक्कामासाठी होत्या.
दरम्यान या चरणपादुका विविध सातारकरांनी घरोघर पाद्य पूजेसाठी नेऊन समर्थ सेवा केली. तसेच समर्थ सेवा मंडळाच्या 40 सेवेकरी मंडळींनी सातारा शहरातून विविध प्रभागात सांप्रदायिक भिक्षा मागितली. या भिक्षेमध्ये सातारकरांनी उदंड आणि सढळ हाताने वस्तू रुपातून मदत ,धान्य ,साखर तसेच रोख रक्कम आणि देणगी स्वरूपात धनादेश तसेच नेट बँकिंग द्वारे द्रव्य दान केले .या सर्व उपक्रमांमध्ये सातारकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी समस्त सातारकर यांचे विशेष आभार मानले आहेत. तसेच या पादुका प्रचार दौयात सातारा शहर मुक्कामामध्ये विशेष योगदान देणाया कार्यकर्त्यांचा सत्कार समर्थ सदन येथे करण्यात आला .
आज रविवारी सकाळी काकड आरती, महापूजा ,आरती झाल्यानंतर हा समर्थ पादुकांचा दौरा पुणे द्वारे मुंबईकडे मार्गस्थ झाला .त्या अगोदर या पादुका प्रचार दौयात विशेष योगदान देणारे समर्थ भक्त हरिभाऊ देशपांडे ,पत्रकार अतुल देशपांडे, संतोष वाघ, अनिल प्रभुणे ,उदय ताडे ,अविनाश वाळींबे, रवींद्र नरेवाडीकर, सुनील कुलकर्णी, बाळासाहेब चव्हाण ,विश्वनाथ पुरोहित सौ.कल्पना ताडे ,सौ.आरती वाळिंबे ,कु.चैत्राली वाळिंबे ,अश्विनी कुलकर्णी, ध्रुव पटवर्धन, गजानन बोबडे, राजेंद्र कुलकर्णी ,रंजन गोडबोले ,आदी कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार समर्थांची रामनामी शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू व प्रसाद देऊन करण्यात आला.
समर्थ सेवा मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक समर्थ भक्त रमेश बुवा शेंबेकर आणि समर्थ भक्त गणपती बुवा रामदासी यांच्या हस्ते हे सत्कार संपन्न झाले. याप्रसंगी वेदमूर्ती विवेक शास्त्राr गोडबोले ,समर्थ सदनचे व्यवस्थापक प्रवीण कुलकर्णी, राजेंद्र कुलकर्णी ,सौ .जयश्री कुलकर्णी यांचे सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा रामदासी यांनी या पादुका प्रचार दौयात मिळालेल्या गहू, तांदूळ, कडधान्य आणि साखर याबाबतची माहिती उपस्थितांना दिली. तसेच रोख स्वरूपात मिळालेल्या देणगीचा दरवर्षीप्रमाणेच अन्नदानासाठी योग्य वापर केला जाईल असे सांगून समस्त सातारकरांचे आभार मानले हा दौरा रविवारी दुपारी मुंबईकडे मार्गस्थ झाला.हा प्रचार दौरा यावर्षी 20 नोव्हेंबर पासून सुरू होत असून 21 नोव्हेंबर पर्यंत सदावर्ते राम मंदिर पुणे येथे या पादुका मुक्कामाला आहेत. त्यानंतर 21 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर असा नऊ दिवसांचा मुक्काम पनवेल येथील कश्यप हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर 29 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या 14 दिवसाचा दौरा श्री मारुती मंदिर बदलापूर येथे असून 12 डिसेंबर ते वीस डिसेंबर नऊ दिवस मुक्काम केळकर सभागृह वडवली अंबरनाथ पूर्व येथे असणार आहे त्यानंतर चरणपादुका 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर या आठ दिवसांसाठी आदित्य मंगल कार्यालय डोंबिवली पूर्व येथे असणार आहेत 27 डिसेंबर ते 4 जानेवारी असा नऊ दिवसांचा काळ ज्ञानेश्वर मंगल कार्यालय डोंबिवली पश्चिम येथे दौयासाठी असून 4 जानेवारी ते 16 जानेवारी हा 13 दिवसाचा कालखंड लक्ष्मीनारायण बाग दादर येथे पादुकांच्या मुक्कामासाठी असणार आहे 16 जानेवारी ते 24 जानेवारी दरम्यान ब्राह्मण सभा मालाड पश्चिम येथे पादुका दौरा वास्तव्यासाठी असून त्यानंतर 24 जानेवारी ते 30 जानेवारी दरम्यान वारकरी संप्रदाय हॉल सीबीडी बेलापूर येथे हा दौरा होणार आहे त्यानंतर 30 जानेवारीला सदावर्ते राम मंदिर पुणे येथे पादुका आगमन होणार असून 31 जानेवारीला समर्थ सदन सातारा येथे या पादुकांचा दौरा पूर्ण होऊन पादुका मुक्कामासाठी येणार आहेत








