Raje Samarjeetsinh Ghatge : सरसेनापती संताजी घोरपडे या कारखान्यात 40 हजार सभासद शेतकरी आहेत, अस मुश्रीफ साहेबांनी सांगितलय तर मुश्रीफ साहेब 40 हजार शेतकऱ्यांचे 40 कोटी कुठं गेले? असा सवाल भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांना केला. आज पत्रकार परिषदेत ते कोल्हापुरात बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, सरसेनापती साखर कारखान्यासाठी जे पैसे गोळा केले त्याच्या खोट्या पावत्या हसन मुश्रीफांनी दिल्या, असा आरोप समरजितसिंह घाटगे यांनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, म्हणूनच काल 16 लोकांनी आवाज उठवला. उद्या 40 हजार शेतकरी बाहेर पडतील.कारखान्याचे मालक म्हणून हसन मुश्रीफ आणि त्यांचे नातेवाईक कागदोपत्री दिसत आहेत. मग 40 हजार शेतकरी कुठं गेले हे मुश्रीफ यांनी सांगावं? 40 हजार शेतकऱ्यांची सर्वसाधारण सभा कधी घेतला याचा पुरावा दाखवा असेही ते म्हणाले.
हसन मुश्रीफांवर टीका करताना पुढे ते म्हणाले, मुश्रीफ साहेब अमित शाह यांनाच नाही तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना देखील भेटतील. जी 20 परिषदेमध्ये जाऊन कारखान्यासाठी कर्ज देखील मागतील, असा खोचक टोला लगावला. कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार हे जनता ठरवेल. शाहू दूध संघावरून केलेले आरोप सिद्ध करा. अन्यथा 100 कोटींचा मानहाणीचा दावा दाखल करेन असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
Previous Article…म्हणून मी गद्दारी केली; गुलाबराव पाटलांची कबुली
Next Article बांधकाम व्यावसायिकाची 14.50 कोटींची फसवणूक








