Samarjeet Ghatge On Hasan Mushrif : तीन दिवसापूर्वी हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी आणि आयकर विभागाचा छापा पडला त्यावेळी मी दिल्लीत होतो. ज्या ज्या वेळी कारवाई होते तेव्हा मुश्रीफ यांची ठरलेली स्क्रिप्ट आहे. मला कोणती गोष्ट करायची असेल तर ती छाती ठोकून करेन. पाठीमागून किंवा कोणाच्या मागे लपण्याची घाटगे घराण्याची पध्दत नाही.पाठीत खंजीर खूपसण्याची आमची संस्कृती नाही. येत्या काही दिवसात आम्ही काही खुलासे करणार आहोत, जर मुश्रीफांमध्ये पुरुषांर्थ असेल तर जात आणि धर्माच्या मागे त्यांना का लपाव लागतय? असा सवाल आज भाजप जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी पत्रकार परिषदेत केला.
हसन मुश्रीफ हे जातीवाचक आहेत. ते नेहमीच जातीचे राजकारण करतात. मुस्लिम समाजाला टारगेट करत असल्याचा आरोप त्यांनी केला . मात्र अनिल देशमुख , अनिल परब यांच्यावरही कारवाई झाली आहे. नवाब मलिक यांच्यावर अतिरेकी असल्याचे आरोप आहेत. ज्या अतिरेकींमुळे निष्पाप जीव गेले त्यांना पाठिंबा देणाऱ्या नवाब मलिक यांना का पाठिशी घालत आहेत. त्यांची मुश्रीफ यांना काळजी का? असा सवाल करत नवाब मलिक यांच्यावर एवढं प्रेम का आहे? हा संशोधनाचा विषय आहे असे समरजित घाटगे म्हणाले. त्यांनी आरोप करण्यापेक्षा कारवाईला समोर जावे जे सत्य असेल तर बाहेर येईलच असही घाटगे यांनी सांगितलं.
हसन मुश्रीफ यांच्यावर दोनवेळा ईडीची कारवाई झाली त्यावेळी आणि आता देखील माझ्यावर आरोप सुरु आहेत. पराभव दिसू लागल्यानेच माझ नाव घेतल जातं आहे. त्यांना रात्री झोपताना देखील समरजीत घाटगे स्वप्नात दिसतात, असा टोला लगावला. इतकचं काय तर आता माझे कार्यकर्ते सुध्दा त्यांच्या नजरेत दिसत आहेत. माझ्यासोबत आता माझे कार्यकर्ते देखील रात्री झोपताना त्यांच्या स्वप्नात दिसतात.25 वर्षाच्या आमदाराला कार्यकर्ता जड जायला लागला ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे, असे घाटगे म्हणाले.
किरीट सोमय्या हे पुढील आठवड्यात कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. प्रोटोकॉलनुसार मी त्यांना भेटणार आहे. मात्र मुश्रिफांनी ज्या पध्दतीने आरोप केले ते मी कधीच केले नाही. मात्र किरीट सोमय्यांनी जे आरोप त्यांच्यावर केले ते मी करू शकलो नाही याची खंत वाटते. येणाऱ्या काळात अजून काही प्रकरण मी जनतेसमोर आणेन, असा इशाराही घाटगे यांनी दिला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








