आयुष्मान खुरानासोबत जमणार जोडी
समांथा रुथ प्रभूचा ‘शांकुतलम’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील समांथाच्या अभिनयाला चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत देव मोहन, मोहन बाबू आणि अल्लू अराह दिसून आले आहेत. समांथा आता आयुष्मान खुरानासोबत एका हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसून येणार आहे.

आयुष्मान खुराना अन् समांथाच्या या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान करणार आहेत. आयुष्मान यात एका वॅम्पायरच्या भूमिकेत तर समांथा एका राजकन्येच्या भूमिकेत दिसून येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘वॅम्पयार ऑफ विजय नगर’ असू शकते. या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक करणार आहेत.
‘स्त्राr 2’चे चित्रिकरण संपल्यावर या नव्या चित्रपटाचे काम हाती घेतले जाणार आहे. समांथाचा शांकुतलम हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. समांथा याचबरोबर अमेझॉन प्राइमच्या सिटाडेल या सीरिजच्या हिंदी आवृत्तीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर आयुष्मानचा ‘ड्रीम गर्ल 2’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.









