लखनौ
उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाने मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक स्वतंत्ररित्या लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयएनडीआयए आघाडीमधील मतभेद स्पष्ट झाल्याची चर्चा आहे. देशात ही आघाडी एक आहे मात्र, राज्यांमध्ये या आघाडीतील पक्ष एकमेकांच्या विरोधात लढताना दिसत आहेत, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. सपचे नेते अखिलेशसिंग यादव यांनी मध्यप्रदेशातील दोन विधानसभा जागांवरचे उमेदवारही घोषित केले. या दोन्ही जागा उत्तर प्रदेशच्या सीमेला लागू असून त्या राखीव जागा आहेत. या दोन्ही जागांवर उमेदवार घोषित करताना त्यांनी काँग्रेसला विश्वासात घेतले नसल्याची चर्चा आहे. काँग्रेसही या जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मध्यप्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक या वर्षाच्या अखेरीस होत असून ती महत्वाची मानली गेली आहे.









