हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
बेळगाव : समादेवी गल्ली येथील वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना, वैश्यवाणी महिला मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या श्री समादेवी जन्मोत्सव सोहळ्याची मंगळवारी उत्साहात सांगता झाली. समादेवी मूर्तीला महाअभिषेक केल्यानंतर संदीप कडोलकर, स्मिता कडोलकर, वैष्णवी धनवडे यांच्या हस्ते नवचंडिका होमला प्रारंभ झाला. यावेळी ऋषिकेश हेर्लेकर गुरुजी पुणे येथील नवाथे गुरुजी, भूषण काने, राजेश रानडे, नीलकंठ हेर्लेकर, दत्तात्रय भावे, देशपांडे गुरुजी आदींच्या नेतृत्वाखाली नवचंडिका होम करण्यात आला. दुपारी 12 वा. श्री समादेवीला नैवेद्य दाखवून महाप्रसादाला प्रारंभ झाला. यावेळी हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. नवचंडिका होम आणि महाप्रसाद यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दत्ता कणबर्गी, विश्वस्त मोहन नाकाडी, महादेव गावडे, मोतीचंद दोरकाडी, सचिव अमित कुडतूरकर, युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन जुवळी, उपाध्यक्ष रवी कलघटगी, महिला मंडळाच्या अध्यक्षा अंजली किनारी, सचिव वैशाली पालकर, प्रसाद निखार्गे, परेश नार्वेकर यांसह कार्यकारी मंडळ, महिला मंडळ, सदस्य आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.









