सावंतवाडी / प्रतिनिधी-
क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिना निमित्त स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तेजस्वी क्रांतिकारांना कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्यामाध्यमातून अभिवादन करण्यात आले.
यावेळी कोमसापचे अध्यक्ष अँड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, माजी अध्यक्ष प्रा. सुभाष गोवेकर, अँड. नकुल पार्सेकर, राजू तावडे, दिपक पटेकर, रमेश दळवी, विनायक गांवस, प्रा. रूपेश पाटील आदी उपस्थित होते









