राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह मान्यवरांकडून आदरांजली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी त्यांना देशभरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतर सर्व नेत्यांनी श्र्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल स्मृतीस्थळाला भेट देऊन वाजपेयींना आदरांजली वाहिली. यावेळी वाजपेयी यांच्या कुटुंबातील सदस्य अटल समाधीस्थळी उपस्थित होते. अटलबिहारी वाजपेयी यांची मानसकन्या नमिता भट्टाचार्य आणि जावई रंजन भट्टाचार्यही उपस्थित होते.









