प्रतिनिधी /बेळगाव
रामलिंगवाडी, गोवावेस येथील ‘गोवावेसचा राजा’ या मंडळाच्यावतीने हुतात्मा दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये शेकडो तरुणांनी रक्तदान करून हुतात्म्यांना अभिवादन केले.
शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या हस्ते झाले. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. 50 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सीमाप्रश्नाची सोडवणूक व्हावी ही इच्छा व्यक्त केली.
यावेळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, प्रशांत भातकांडे, राजकुमार बोकडे, शिवाजी हावळाण्णाचे, सुनील बोकडे, उमेश भातकांडे, सदानंद बिर्जे, दीपक तुळसकर, प्रवीण रेडेकर, सचिन केळवेकर, प्रवीण पाटील, अनिकेत जांगळे, मनोज बिर्जे यांसह इतर उपस्थित होते.









