वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघामध्ये आता ब्रिटनच्या जेसन रॉयच्या जागी फिल सॉल्टला बदली खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. काही वैयक्तिक कारणास्तव जेसन रॉयने आयपीएल स्पर्धेसाठी आपण उपलब्ध राहू शकणार नाही, असे स्पर्धा आयोजकांना कळविले होते.
फिल सॉल्टला गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या आयपीएल स्पर्धेसाठीच्या क्रिकेटपटूंच्या लिलावात फिल सॉल्टला कोणीही विकत घेतले नव्हते. सॉल्टने 2023 च्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व केले होते.









