ऑनलाईन टीम / तरुण भारत :
गुजरातमधील मोरबी येथे मीठाच्या कारखान्याची भिंत कोसळून 12 मजूरांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर 18 मजूर जखमी आहेत. त्यामधील काहींची प्रकृती गंभीर असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (12 laborers killed in wall collapse at Morbi, gujrat GIDC)
मिळालेल्या माहितीनुसार, मोरबी येथील जीआयडीसीमध्ये असलेल्या मीठाच्या कारखान्याची भिंत दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोसळली. यावेळी कारखान्यात 30 मजूर काम करत होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बचावपथके दाखल झाली. जेसीबीच्या सहाय्याने भिंत उचलून खाली दबलेल्या मजूरांना बाहेर काढण्यात आले. त्यामधील 12 मजूरांचा मृत्यू झाला. तर उर्वरित 18 मजूर जखमी झाले असून, काहींची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दुर्घटनेपूर्वी अर्धा तास या कारखान्यात 70 मजूर काम करत होते. पण त्यामधील 40 मजूर जेवायला बाहेर पडले. त्यानंतर काही वेळातच कारखान्याची भिंत कोसळली. त्यामुळे सुदैवाने हे 40 मजूर बचावले.