‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपट
अभिनेत्री सलमान खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट 21 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमान खानसोबत या चित्रपटात वेंकटेश, पूजा हेगडे आणि जगपति बाबू हे मुख्य भूमिकांमध्ये दिसून येणार आहेत. ट्रेलरमध्ये सलमान खान हा ‘भाईजान’च्या शैलीत दिसून येत आहेत. ऍक्शन आणि रोमान्सचा मिलाप या ट्रेलरमध्ये दिसून येतो.

सलमान खान आणि पूजा हेगडे ही नवी जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तर दिग्गज अभिनेते वेंकटेश यांनी या चित्रपटात पूजा हेगडेच्या भावाची भूमिका साकारली आहे. जगपति बाबू या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटातील विशेष गाणे ‘येंतम्मा’ प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला चाहत्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असला तरी वादही निर्माण झाला आहे.
उत्तर भारतीय व्यक्तीचे दाक्षिणात्य युवतीवर प्रेम जडत असल्याचे या चित्रपटात दर्शविण्यात आले आहे. चित्रपटात ऍक्शन अन् एंटरटेमेंटचा मोठा डोस दिसून येणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत राघव जुयाल, शहनाज गिल, जस्सी गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम हे कलाकारही दिसून येतील. तर दाक्षिणात्य स्टार रामचरणने यात अतिथी कलाकाराची भूमिका साकारली आहे.









