मुंबई
बॉलीवूडचा भाईजान सलमान खान रस्त्यावर रिक्षचालवताना दिसल्याने चाहत्यामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. सलमान खान त्याच्या हॉलीवूड सिनेमामध्ये पदार्पणाच्या तयारीत आहे. तो सेव्हन डॉग्ज या चित्रपटामध्ये कॅमिओ रोल साकारणार आहे. याप्रसंगी सलमान खान रिक्षाचालकांच्या खाकी गणवेशात रिक्षा चालवताना दिसल्याने चाहते अवाक् झाले आहेत.
सेव्हन डॉग्ज हा चित्रपट सौदी अरेबियामध्ये शुट होणार असून या शुटींगमधला एक व्हिडीओ भाईजानच्या एका फॅनकडून व्हायरल झाला आहे. यामध्ये सलमान खान रिक्षाचालकाच्या रुपात दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खान त्याच्या टीम मधील लोकांसोबत चर्चा करतानाही दिसत आहे. शिवाय त्याने त्याच्या शर्टवर खाकी शर्ट घातल्याचेही व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे.









