मुंबई
वांद्रे (पश्चिम) येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमान खानच्या घराच्या खिडक्या बुलेटप्रुफ बनविण्यात आल्या आहेत. तसेच संपूर्ण गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये हाय सिक्युरिटी ट्रॅकही बसविण्यात आले आहेत. तर येथे हाय रिझोल्युशनचे सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या पुढे पोलीस चौकी ही उभारण्यात आली आहे.
१४ एप्रिलला मागच्या वर्षी सलमान खानच्या घरावर ५ राऊंड गोळीबार झाला होता. त्यानंतर काही महिन्यातच सलमान खानचे निकटवर्ती आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली. या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सलमान खानच्या घरासह संपूर्ण गॅलेक्सी अपार्टमेंटला हाय सिक्युरीटी ट्रॅकने सुरक्षित करण्यात आले आहे.









