९० च्या दशकाच्या सुरवातीला सलमान ( Salman Khan ) आणि दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती ( Ravathi ) यांचा ‘लव्ह’ ( Love ) हा चित्रपट अजूनही बॉलिवूडच्या ( Bollywood ) चाहत्यांच्या आवडत्या चित्रपटापैकि एक आहे. या चित्रपटातील सलमान आणि रेवती यांची केमिस्ट्री चांगली जुळून हि जोडी बॉलिवूडमध्ये सुपरहिट झाली होती. या चित्रपटातील सर्वच गाणी श्रवणीय असून अजूनही रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत.
सलमान खान आणि रेवती यांनी 1991 मध्ये स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर 2023 मध्ये म्हणजे जवळजवळ ३२ वर्षांनी ही जोडी मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
सलाम वेंकी ( Salam Venki ) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या ( Big Boss ) सेटवर आलेल्या रेवती आणि काजल ( Kajal ) यांचे स्वागत सलमान खान यांनी केले.
बिग बॉस- 16 च्या ‘वीकेंड का वार’ भागादरम्यान, रेवती आणि काजोल त्यांच्या ‘वेंकी’ ( Venki ) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी खास पाहुण्या म्हणून हजर झाल्या होत्या. या कार्यक्रमातच सलमान खानने येणाऱ्या टायगर- 3 ( Tiger- 3 ) मध्ये रेवती आणि तो स्वत: 32 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याचे जाहिर केले.
सलाम वेंकी या चित्रपटाचे दिग्दर्शनासाठी तिथे आलेल्या रेवतीची ओळख करून देताना, खानने खुलासा केला की तो लवकरच टायगर 3 साठी अभिनेत्रीसोबत पुन्हा एकत्र येणार आहे. यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा आधीच वाढल्या आहेत.
टायगर- ३ मध्ये रेवती गिरीश कर्नाड यांच्या जागी एक सिनीयर महीला गुप्तचर अधिकाऱ्याचा रोल साकारणार आहे. माध्यमाशी बोलताना रेवती म्हणाली, की, “टायगर 3 मध्ये मी गिरीशजींची जागी नवीन आलेल्या रॉ प्रमुखाची भुमिका साकारत आहे.”