वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तान क्रिकेट मंडळाने माजी कर्णधार सलमान बट याची राष्ट्रीय निवड समितीमध्ये निवड केली आहे. पुढील वर्षी पाक व न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे.
39 वर्षीय सलमान बट 2010 मध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरल्यानंतर त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्या आली होती. हा कालावधी संपल्यानंतर 2016 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले हेते. पाक निवड समितीमध्ये त्याच्यासह कामरान अकमल, राव इफ्तिखार अंजुम यांना मुख्य निवड सदस्य वहाब रियाझचे सल्लागार म्हणून निवडण्यात आले आहे.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील बंदीनंतर बटने पुनरागमन केल्यानंतर देशी क्रिकेटमध्ये फलंदाज व कर्णधार म्हणून भरपूर यश मिळविले. पण राष्ट्रीय संघासाठी त्याचा कधीही विचार करण्यात आला नाही. स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील त्याचा साथीदार मुहम्मद आमिरला राष्ट्रीय संघातून खेळण्याची संधी देण्यात आली होती. बटला गेल्या महिन्यात स्थानिक स्पर्धेत समालोचनासाठी पीसीबीने घेतले असून तो सध्य राष्ट्रीय टी-20 चॅम्पियनशिपमध्ये व्यग्र आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका 12 जानेवारीपासून सुरू होणार आहे
कामरान अकमलने 53 कसोटी, 157 वनडे व 58 टी-20 सामने खेळले आहेत तर बटलने 33 कसोटी, 78 वनडे, 24 टी-20 आणि अंजुमने एक कसोटी 62 वनडे, 2 टी-20 सामने खेळलेले आहेत









