Latur Government Medical College : लातूरमधील शासकीय महाविद्यालयातील रुग्णालयात रूग्णांच्या जिवाशी खेळ केला जातोय.याबाबतचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलं होत आहे.या व्हिडिओत चक्क सुरक्षारक्षक वैद्यकीय उपचार करत असल्याचं दिसतयं. या घटनेने लातुर परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमक काय घडलं
काल रात्री रेणापूर तालुक्यातील वाला या गावचे शब्बीर शेख अपघातामध्ये जखमी झाले होते. अपघानातंर त्याना शासकीय महाविद्यालय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले यावेळी हा प्रसंग उघडकीस आला.त्यांना वार्ड नंबर 47 मध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासलं. नर्सला सलायन आणि इंजेक्शन देण्याची सूचना केली.मात्र नर्सने सुरक्षासक्षकाला इंजक्शन आणि सलाईन लावायला सांगितलं.सुरक्षारक्षक उपचार करण्यासाठी गेला तेव्हा रूग्णाच्या नातेवाईकांनी विरोध केला.मात्र सुरक्षारक्षक उपचार करत राहिला. याचे फुटेज सीसीटीव्हि कॅमेरात कैद झाले आहेत. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विलासराव देशमुख शासकीय यंत्रणेला जाग आली. याबबात चौकशी समिती नेमूण कारवाई करण्य़ाची माहिती देण्यात आलीय.








