पुढच्या वर्षापासून त्र्यंबक (Trimbakeshwer) मंदिराला धूप दाखवणार नाही, अन्यथा उरुसाची प्रथाच बंद करू असे त्र्यंबकराजा उरुसमंडळाचे आयोजक सलिम सय्यद यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे गेले काही दिवस त्र्यंबकेश्वर मंदिरात चाललेल्या जातीय तिढा सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच धुप दाखवण्याची प्रथा आम्ही जपत आलो असून यामुळे काही चुक झाली असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला माफ करावे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
माध्यमांशी बोलताना सय्यद अहमद म्हणाले, “ही परंपरा आमच्या आजोबांच्याही अगोदरपासून चालत आलेली असल्यामुळे आम्ही ही परंपरा जपली आहे. मात्र असं होईल असं वाटलं नव्हतं. आत्ता कुठेतरी थांबावं असं वाटत आहे. आमच्याकडून जर काही चुका झाल्या असल्या तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफ करावं. तसेच मंदिराला धूप दाखवणार नाही, अन्यथा उरुसाची प्रथाच बंद करू” असेही ते म्हणाले.
दरम्यान 13 तारखेला झालेल्या घटनेनंतर हिंदू महासंघाच्या वतीने त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर गोमुत्राने शुद्धीकरण करण्यात आले. यावेळी गोमुत्र शिंपडल्यानंतर हींदू महासंघकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच उरूसाचे आयोजक असणाऱ्या चार व्यक्तींवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.








