सेन्सेक्स 413 अंकांनी नुकसानीत : निफ्टीचा प्रवासही घसरणीसोबत बंद
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक प्रभावीत होत बंद झाले आहेत. यामध्ये वाहन क्षेत्रात झालेल्या मजबूत विक्रीचा दबावात सेन्सेक्सला 400 तर निफ्टीला 112 अंकांचा फटका बसला असल्याचे दिसून आले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने मंगळवारी दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 413.24 अंकांनी घसरुन निर्देशांक 0.66 टक्क्यांसोबत 61,932.47 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 112.35 अंकांच्या नुकसानीसोबत निर्देशांक 0.61 टक्क्यांसोबत 18,286.50 वर बंद झाला आहे. निफ्टीत सर्वाधिक नुकसानीत 1.67 टक्क्यांनी कोटक महिंद्रा बँकेचे समभाग घसरणीत राहिल्याची नोंद केली आहे.
बीएसई सेन्सेक्समध्ये मंगळवारच्या सत्रात दिवसभरातील कामगिरीमध्ये एचडीएफसीचे समभाग सर्वाधिक म्हणजे 2.21 टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून यामध्ये टाटा मोर्ट्स 1.84, एचडीएफसी बँक 1.76, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 1.82, कोटक महिंद्रा बँक 1.57, भारती एअरटेल 1.27, मारुती सुझुकी 1.43, सनफार्मा 1.38, रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 1.33 टक्क्यांनी आणि पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग हे 1.19 टक्क्यांनी नुकसानीत राहिल्याचे दिसून आले. यासोबतच अन्य कंपन्यांमध्ये एचसीएल टेक, आयटीसी, लार्सन अॅण्ड टुब्रो, टेक महिंद्रा आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभागही घसरणीत राहिले आहेत.
दुसऱ्या बाजूला सेन्सेक्समध्ये बजाज फायनान्सचे समभाग 0.98 टक्क्यांनी उसळी घेत बंद झाले. एनटीपीसीचे समभाग 0.85 टक्के, स्टेट बँक 0.74, हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन यांचे समभाग हे 0.43 टक्क्यांनी मजबूत तर इन्फोसिसचे समभाग वधारत बंद झाले आहेत.
अभ्यासकांच्या नजरेतून…
भारतीय बाजाराची कामगिरी ही मागील काही दिवसांपासून विक्रमाच्या दिशेने प्रवास करत आहे. परंतु बाजारातील मोठ्या विक्रीच्या दबावामुळे ही कामगिरी काहीशी दबावामध्ये सुरु राहिली असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये काही स्मॉलकॅप आणि मिडकॅप यांच्या समभागांचीही सकारात्मक कामगिरी राहिली असल्याची निरीक्षणं शेअर बाजार अभ्यासकांकडून नोंदवण्यात आली आहेत.









