नवी दिल्ली
बांधकाम क्षेत्रातील कंपनी डीबी रिअॅल्टीच्या प्रवर्तकांनी कंपनीतील 3 टक्के हिस्सेदारी विकली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनी जवळपास 3 टक्के इतकी हिस्सेदारी 301 कोटी रुपयांना विकली आहे. सदरच्या रक्कम उभारणीतून कंपनी आपल्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करणार असल्याचे समजते. 1373 कोटी रुपयांचे कर्ज कंपनीवर आहे. गेल्या काही वर्षापासून कर्जाचा भार कमी करण्यासाठी कंपनीचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.









